Breaking

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूरच्या क्रांती चौकात निदर्शने ; मेधा पाटकर,तिस्ता सेटलवाड व तुषार गांधी यांचेवरील खोट्या केसेस तात्काळ रद्द करा*


जयसिंगपुरात पुरोगामी संघटनेकडून निर्देशने

करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी


जयसिंगपूर : मेधा पाटकर या नर्मदा नवनिर्माण अभियान ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा चालवित असून त्यांच्यावर घातलेल्या खोट्या केसेस तात्काळ रद्द कराव्यात. तसेच ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड , छत्तीसगड मधील  आदिवासी भागात त्यांच्या विविध प्रश्नावर काम करणारे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते हिमांशू कुमार यांच्यावर खोट्या बेकायदेशीर केसेस दाखल करून तुरुंगात ठेवले ते संविधान विरोधी आहे.त्यांना तात्काळ सोडून द्यावे आणि ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांच्यावर ही चुकीच्या पद्धतीने आरोप करून तुरुंगात डांबण्याची धमकी देणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात जयसिंगपूर येथील क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.

     मुस्लिम, ख्रिश्चन,दलीत,आदिवासी व अल्पसंख्याकावर तसेच पत्रकार , साहित्यिक ,सामाजिक कार्यकर्ते यांचेवर देशात अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत याचा ही जाहीर निषेध करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्य जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, साहित्यिक पत्रकार आणि लोकशाही वादी कार्यकर्ते यांच्यावरील खोट्या केसेस रद्द करा,मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी..अशा घोषणा देत नगरपालिका पासून ते क्रांती चौक पर्यंत चालत फेरी काढण्यात आली.

    आज झालेल्या निदर्शनात समाजवादी प्रबोधिनी, एन ए पी एम ,राष्ट्र सेवा दल,लाल बावटा कामगार युनियन,अंनिस तसेच पुरोगामी मंचचे डॉ. चिदानंद आवळेकर, प्रा.एफ.वाय. कुंभोजकर, प्रा.ए.एस.पाटील,महावीर व्हसाळे,मा. अशोक शिरगुपे,, कॉ.रघुनाथ देशींगे, खुतबुद्दिन दानवाडे , प्रा.शांताराम  कांबळे,आप्पा बंडगर ,डॉ.सुनील बनसोडे,डॉ.तुषार घाटगे, बाबासाहेब नदाफ,खंडेराव हेरवाडे,सचेतन बनसोडे हे प्रमुख  कार्यकर्ते सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा