![]() |
जयसिंगपुरातील शिक्षकांच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शासनाच्या आदेशानुसार जयसिंगपूर शहरातील सर्व शाळांमध्ये व जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण विभागामार्फत दि.९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे भरगच्च पद्धतीने आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा यांचे उत्तम पद्धतीने आयोजन करणेत आले होते.त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचे दुष्परिणाम ,हर घर झेंडा याबाबत व्याख्यानांचे आयोजन,ज्येष्ठ स्वातंत्र सैनिकांचा सत्कार यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
जयसिंगपूर मधील उद्योजक मा.सागर आडगाने आणि परिवार यांनी 'बालकांची पंगत' या उपक्रमांतर्गत नगरपालिकेच्या शाळांमधील सुमारे ९०० विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस फळे व खाऊ वाटप केले.
दि.११/८/२०२२ रोजी सर्व शाळांनी 'हर घर झेंडा' जनजागृती साठी शाळेच्या परिसरात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या.तसेच आज दि.१३/०८/२०२२ रोजी सकाळी जयसिंगपूर नगरपरिषद व शिक्षण विभाग जयसिंगपूर यांचेमार्फत शहरातील सर्व शाळांमधील शिक्षक-शिक्षकांची मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये शिरोळ तालुक्याचे मा.तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा मोरे - धुमाळ ,श्री.महेश चोथे , विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग कोल्हापूर, श्री.तैमूर मुल्लाणी, मुख्याधिकारी, जयसिंगपूर नगरपरिषद, श्री.हणमंत बिराजदार, प्रशासन अधिकारी, जयसिंगपुर पोलीस ठाण्याचे श्री.वाघ साहेब,श्री. मेघन देसाई, केंद्र प्रमुख,नगरपालिका शिक्षण विभाग, जयसिंगपूर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका नगरपालिका जयसिंगपूरचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दि. ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये शहरामध्ये हर घर झेंडा उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर तर्फे सर्व शाळांमध्ये राबविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे २०० शिक्षकांनी मोटार सायकल रॅली मध्ये सहभाग नोंदविला होता. विविध प्रसार माध्यमाद्वारे या उपक्रमाचा प्रसार करणेत आला.शहरातील सर्व नागरिकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साही व आनंदी वातावरणामध्ये साजरा करावा यासाठी मा.मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी व प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम राबविणेत आले.
आजच्या बाईक रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे महिला शिक्षकांचा सक्रिय सहभाग- जयसिंग महाराज व छ. शाहुराजांच्या पुतळ्याना पुष्पहार घालून अभिवादन - तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ व महेश चौथे यांच्या हस्ते-देशभक्ती दर्शवणारी वेशभूषा- हातात व गाडीला तिरंगा - हर घर तिरंगा जनजागृतीसाठी जोशपूर्ण घोषणा
या कार्यक्रमामध्ये जयसिंगपूर कॉलेजचा NSS चा विद्यार्थी विक्रांत माळी यांनी स्फूर्तीदायी देशभक्तीपर गीत गायन करून उपस्थितांच्या मध्ये राष्ट्र चेतना निर्माण केली.मा.मेघनाद देसाई यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचा समापन राष्ट्रगीताने झाले.
जयसिंगपूर नगर परिषद शिक्षण विभागाद्वारे आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा