Breaking

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपुरात चलनाचा प्रवास या नाणी संग्रहाचे प्रदर्शन १४ व १५ ऑगस्ट रोजी*


दुर्मिळ नाणी व नोटांचे प्रदर्शन


*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


जयसिंगपुर : शहरात चलनाचा प्रवास या नानी संग्रहाचा दिनांक १४ व १५ ऑगस्ट,२०२२ रोजी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तरी या दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन पाहण्या संदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

  पहिला रुपया कोणता, पहायचाय का? शेरशाह कोण होता?

सातवाहन, क्षत्रप ही नावं आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचली होती, त्यांची नाणी कशी होती बघितली आहेत कधी ?

विजयनगरचा सुवर्णकाळ अनुभवायचा आहे?

मुघल, विविध संस्थानिक, शिंदे, होळकर, गायकवाड, पेशवे, निझाम यांची नाणी बघणार?

राजा छाप, राणी छाप रुपयांबद्दल आपण आजी आजोबांकडून ऐकलं होतं, ते रुपये बघायला आवडेल?

शंभर पैश्यांचा रुपया होतो हे अभ्यासात शिकवतात ते पैसे कसे असतात याची उत्सुकता आहे?

भूगोल मध्ये विविध देशांची नावे, खंड आपण शिकतो त्या देशांचे चलन बघायचे आहे?


*हिंदवी स्वराज्याची, स्वराज्यलक्ष्मी असलेली, छ. शिवाजी महाराजांनी तयार केलेलं स्वराज्याचं पहिलं चलन असलेली शिवराई पहायचीये?*


_जर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर_

_या, बघा आणि अनुभवा पहिल्या नाण्यापासून ते चालू नाण्यापर्यंत चा प्रवास, नाण्यांचे अनोखे विश्व एकाच दालनात एका छताखाली_


रविवार दिनांक १४/८/२०२२  आणि सोमवार दिनांक १५/८/२०२२ रोजी श्री नामदेव सांस्कृतिक भवन, जयसिंगपूर येथे.


अधिक माहितीसाठी संपर्क :

) श्री. महेंद्र तेलंग : +91 80071 34183

२) श्री. संदीप पिसे : +91 98904 90165

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा