![]() |
औरवाडच्या परिवाराने दिली शिष्यवृत्ती |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
औरवाड : पारंपारिक धार्मिक विधीच्या पद्धतीत आता बदल होत असताना दिसत आहे ,रूढी परंपरांना फाटा देत आप्तेष्टांच्या स्मृती जपताना काळाच्या ओघात त्यात सामाजिक उपक्रमांची भर घातली जात आहे.
औरवाड मधील व्यावसायिक बंधू श्री अनिल दुग्गे व राजेंद्र दुग्गे यांच्या आई व मामा श्री महावीर शेट्टी यांची बहीण कै.श्रीमती. विजयमाला सूर्यकांत दुग्गे यांचे ०२ ऑगस्टला निधन झाले होते. या नंतर प्रा.महावीर शेट्टी यांनी आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून शिष्यवृत्ती देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
औरवाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रुपये प्रमाणे एकूण १०००० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे.
आपल्या परीवाराबरोबरच समाजाचे ऋण असते याची उतराई या परिवाराने जपली आहे .या परिवाराचे हे मानवतेचे कार्य निश्चित समाजाला प्रेरणादायी ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा