Breaking

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

*सुटाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचा केला सत्कार व एमफुक्टो आंदोलन मागणीबाबत सकारात्मक चर्चा*


सुटा शिष्ट मंडळाने घेतली मा.नामदार चंद्रकांत दादांची भेट


*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ अर्थात सुटा शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा येथोचित सत्कार व अभिनंदन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनामधील मागण्यांबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली.

   याप्रसंगी मा.नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वच मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करेल असे त्यांनी आश्वासित केले.

      यावेळी सुटाचे कार्यवाह प्रा.डॉ. डी. एन.पाटील, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. प्रकाश कुंभार,प्रा.डॉ.आर.जी.कोरबू, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अरुण पाटील,प्रा.डॉ. सयाजी पाटील,प्रा. डॉ.वैशाली सारंग व अन्य सुटा प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा