![]() |
शहीद कालवश डॉ.कलबुर्गी यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना समस्त पुरोगामी कार्यकर्ते |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
जयसिंगपूर : कन्नड भाषेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर साहित्य संपदा लिहून महात्मा बसवण्णा यांचा विवेकी विचार मांडण्याचे धाडस शहीद डॉ.एम.एम.कलबुर्गी यांनी केले आहे. एक निर्भिड आणि द्रविडीयन संस्कृतीचा खरा पाईक म्हणजे डॉ कलबुर्गी आहेत. त्यांचे साहित्य आणि विचार मानवी समाजा पर्यंत पोहोचवणे हीच खरी आदरांजली होईल असे उदगार प्रा.ए.एस्.पाटील यांनी काढले.
समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर च्या वतीने ३० ऑगस्ट डॉ.एम.एम. कलबुर्गी यांच्या स्मृतिदिन अभिवादन सभा घेण्यात आली.७ वर्षा पूर्वी त्यांचा सनातनी विचाराच्या व्यवस्थेने बळी घेतला पण आज ही ते साहित्य आणि विवेकी विचाराने अमर आहेत.अशा प्रकारच्या भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
यावेळी मा.एफ. वाय कुंभोजकर, डॉ.चिदानंद आवळेकर,मा.अशोक शिरगुप्पे, प्रा.शांताराम कांबळे,प्रा. डॉ. तुषार घाटगे,मा. महावीर व्हसाळे आणि हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉम्रेड मा. रघुनाथ देशिंगे यांनी केले. तर आभार डॉ. चिदानंद आवळेकर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा