![]() |
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्स दिनानिमित्त जयसिंगपुरातील प्रसिद्ध साप्ताहिक जयसिंगपूर नगरी व जयसिंगपूर नगरी न्यूज चैनलच्या वतीने संपादक मा. राजू उर्फ महेबूब सय्यद यांनी समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री मा.राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार मा. उल्हासदादा पाटील, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के, शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. दत्तात्रय बोरीगिड्डे, शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख मा. वैभव उगळे यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. सलग १० वर्ष सुरू असलेला मोफत जिलेबी वाटपाचा उपक्रम याही वर्षी सुरू होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध स्तरातील घटकांना मोफत जिलेबी वाटप करण्यात आले. यानंतर मान्यवर वक्त्यांची भाषणे झाली. यामध्ये विशेष करून जयसिंगपूरच्या कै. राम कृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिराचा पहिली चा विद्यार्थी कु. रविराज प्रभाकर माने या विद्यार्थ्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उत्तम भाषण केले.
उद्योजक सामाजिक सेवा पुरस्कार- मा.सुनिल वायचळ, उत्कृष्ट समाजकार्य पुरस्कार-शुक्राचार्य उर्फ बंडू उरुणकर, उत्कृष्ट युवा समाजसेवा पुरस्कार अमित माणगावे,आदर्श शिक्षक पुरस्कार-मा.सौ. संध्या दिलीप नलगे ,उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार- चंद्रकांत पाटील- उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार-मा. विठ्ठल थोरवत-,उत्कृष्ट कार्य सेवा पुरस्कार - मा. सुरेश कोळी- ,उत्कृष्ट कार्य सेवा पुरस्कार-मा. अरुण पवार- ,उत्कृष्ट कार्य सेवा पुरस्कार-मा.सुभाष धनवडे व मा. उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार-संदीप कांबळे यांना सन्मानपत्र व शील्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सन्मान हा प्रतिष्ठित घटकांचा केला जातो हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र याला छेद देत सन्मान हा सर्वसामान्यांचा मात्र असामान्य कामगिरी करणाऱ्या घटकांचा केला आहे हे या कार्यक्रमाचे उत्तम वैशिष्टय आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. राजू उर्फ मेहबूब सय्यद, आभार प्रदर्शन मा. संजय सुतार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर माने,सौ. रेखा गायकवाड मॅडम व इक्बाल इनामदार यांनी उत्तम पद्धतीने केले.
जयसिंगपूर नगरी न्यूज नेटवर्कच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातून आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या घटकांचा गौरव करून खऱ्या अर्थानं उत्तम कार्य करीत असल्याबाबतचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून मा. राजू सय्यद याचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा