Breaking

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूरच्या समाजवादी प्रबोधिनीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन..*


समाजवादी प्रबोधिनीत लोकशाहीर अण्णाभाऊ जयंती 


*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


 जयसिंगपूर :   समाजवादी प्रबोधिनी शाखा जयसिंगपूर येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

       ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.एफ.वाय. कुंभोजकर आणि डॉ.चिदानंद आवळेकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. देशातील सद्य परिस्थिती ही अत्यंत जातीय,धार्मिक आणि असंविधनिक पद्धतीने विचारधारा लादून आणीबाणी लादली जाते आहे.अशा वेळी आण्णा भाऊ साठे यांनी दिलेला क्रांतीचा आणि संघर्षाचा विचार घेऊन परिवर्तनाची लढाई लढावी लागेल असे मत डॉ. चिदानंद आवळेकर यांनी व्यक्त केले.

येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिन आणि १५ ऑगस्ट हा आझादी ७५ अमृत महोत्सव साजरा करण्याचे  नियोजन करण्यात आले.

     कोथळीचे  ज्येष्ठ गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ते मा.संभाजी परीट व इचलकरंजी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक चव्हाण यांच्या निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली..

 यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.अशोक शिरगुप्पे, के.एस.दानवाडे,महावीर व्हासाळे,प्रा.शांताराम कांबळे, कॉ. रघुनाथ देशिंगे, डॉ.सुनील बनसोडे,डॉ. तुषार घाटगे, मिरासाहेब  कांबळे,खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, बाबासाहेब नदाफ आणि अमर खराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा