Breaking

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूरच्या मालू हायस्कूल मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा. आदगोंडा पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न.*


मालू हायस्कूल मध्ये स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण


*सौ.गीता माने : सहसंपादक*


 जयसिंगपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'स्वराज्य महोत्सव' व 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत मालू प्रशालेमध्ये १३ ऑगस्ट,२०२२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हयात स्वातंत्र्य सेनानी पैकी शिरोळ तालुक्यातील एकमेव स्वातंत्र्यसेनानी मा.आदगोंडा देवगोंडा पाटील वय वर्षे १०७  यांचे शुभ हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.              

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन मा.राजेंद्र मालू हे उपस्थित होते. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आज वयाच्या १०७ व्या वर्षी चिरंजीव मा.महावीर पाटील,नातू चि. प्रतीक पाटील यांच्या साक्षीने त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील आठवणींना उजाळा दिला.

      स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मा.आर.आय.पोवार यांनी केले .पाहुण्यांचा परिचय श्री. एस.व्ही. हजारे , आभार श्री. ए. एस. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. ए.के. भिलवडे व सौ.व्ही एस शिंदे यांनी केले.*

   सदर कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य मा.चंद्रकांत जाधव,.पर्यवेक्षक श्री.आर.जी.देशपांडे,श्री.एस. पी. कोळी, सौ.रुपाली पाटील  तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा