Breaking

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूरच्या मालू हायस्कूलचे कलाशिक्षक संजय सुतार यांची पाठ्यपुस्तक समीक्षणासाठी बालभारती कडून निवड*


मालू हायस्कूलचे कलाशिक्षक संजय सुतार


*सौ.गीता माने : सहसंपादक*


जयसिंगपूर  : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे यांच्यावतीने एकात्मिक व द्विभाषिक इयत्ता दुसरी भाग 3 व 4 च्या पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी आयोजित समीक्षण सत्रासाठी महाराष्ट्रातील एकूण 20 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे,त्यामध्ये लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर मधील कलाशिक्षक श्री. संजय सुतार यांना समीक्षण सत्रासाठी बालभारती पुणे, यांचेकडून निमंत्रित करण्यात आले आहे.

    त्यांच्या या निवडीचे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा