Breaking

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

*चोरीस गेलेला डंपर जप्त करण्यात शिरोळ पोलीसांना मोठे यश*


आरोपीसह शिरोळ पोलिस ठाण्याचे यशस्वी गुन्हे शोध पथक


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


 शिरोळ : ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील पोलीस ठाण्यात फिर्यादी किरण गुरापा कांबळे व.व.26 रा.बेघर वसाहत, धरणुती ता शिरोळ जि.कोल्हापूर याने त्याच्या ताब्यात असलेली टाटा कंपनीची माॅडेल नं 2009 ,चारचाकी डंपर नं.MH09 FL- 2705 हे वाहन खण बंद असल्याने दहा ते बारा दिवसापासुन घटनास्थळी लावलेले होते. ते दिनांक 25/08/ 2022 रोजी रात्री 11.30.वा.ते दि.26/08/2022 रोजी रा.01 वाजणेच्या दरम्यान लमाणी वसाहत, धरणुती येथून अज्ञात चोरट्याने फिर्यादी च्या संमतीशिवाय व लबाडीने चोरून नेलेबाबत फिर्यादीने फिर्याद दिलेने शिरोळ पोलीसांनी आय.पी.सी.कलम 379 प्रमाणे गु.र.नं 181/2022 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत मा. पो.नि.मा.दत्तात्रय बोरिगिडडे यांनी गुन्हा शोध पथकातील अंमलदारांना योग्य त्या सूचना देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सांगितले होते.

      सदर गुन्ह्यातील संशयित सचिन पुंडलिक लमाणी (राठोड) रा.व्हणयाळ तांडा ता.बिळगी जि.बागलकोट हा चोरीस गेलेल्या डंपर च्या विक्रीचा सौदा करणेसाठी कनकदास सर्कल बिगळी जि.बागलकोट येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी ही गुन्हा शोध पथकास गुन्हयाचा तपास करीत असतानाच गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळालेनंतर सदरबाबत मा.पोलीस अधीक्षकसो कोल्हापूर यांचेकडून कर्नाटक राज्यात जाऊन आरोपीस ताब्यात घेणेबाबत परवानगी घेऊन बातमीदाराने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन संशयित आरोपी सचिन पुंडलिक लमाणी (राठोड) रा.व्हणयाल तांडा जि.बागलकोट यास सापळा रचून शिताफीने पकडून अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आलेले आहे.

      गुन्हयाबाबत संशयिताकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याने आणि त्याचा मित्र सुनील रामापा राठोड रा.लमाणी वसाहत, नांदणी नाका,धरणगुती मूळ रा.आरकेरी तांडा ता.बिळगी जि.बागलकोट असे दोघांनी मिळून केलेचे व चोरीतील डंपर हा शेडबाळ ता.कागवाड येथे ठेवलेबाबत गुन्हयाची कबूली  दिली.सदर आरोपी नं 1 सचिन पुंडलिक राठोड यास मे कोर्टात हजर केले असता त्यास मे कोर्टानी 03 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे,तर आरोपी नं 02 सुनिल राठोड हा अद्याप ही फरार आहे.सदर चोरीस गेलेले डंपर हे निवेदन पंचनाम्याने जप्त करण्यात आलेले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस नाईक ताहीर मुल्ला करीत आहेत. सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक बलकवडेसो,अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी वैजनेसो आणि पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरिगिडडेसो यांच्या मार्गदर्शनाखाली भोजणेसो, सानपसो, ताहीर मुल्ला, रहीमान शेख,युवराज खरात, संजय राठोड, सायबर पोलीस ठाणे सचिन बेंडखळे ईत्यादीनी केलेली आहे.सदर कारवाईबाबत शिरोळ पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.आता पर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा