![]() |
श्री व सौ.डॉ.आवळेकर पुरस्कार स्वीकारताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूरातील सुप्रसिद्ध धन्वंतरी व सामाजिक संवेदनशील म्हणून ओळख असणारी वैद्यकीय क्षेत्रातील जोडी अर्थात डॉ. चिदानंद आवळेकर व डॉ.जयश्री आवळेकर यांना भरत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक संचलित भरत मेडिकल ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय डॉ.एस.के.पाटील धन्वंतरी पुरस्काराने मा.खासदार मा. राजू शेट्टी व मा. गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुळात शिरोळ तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या असंख्य जोडी पैकी डॉ. श्री.व सौ. आवळेकर दाम्पत्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जनसामान्यांची सेवा करीत व कोरोना महामारीच्या काळात उच्च कोटीची कामगिरी करून वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीचा आदर्श तमाम डॉक्टर्सना घालून दिला. डॉ. आवळेकर परिवार नेहमीच जनसामान्यांच्या हितार्थ कार्यरत आहे. विविध पुरोगामी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अखंडितपणे आर्थिक सहकार्य व स्वतः सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा उदात्त कार्य त्यांच्या हातून घडले आहे. समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खादी ग्रामोद्योग भांडार व अन्य पुरोगामी संस्थेच्या माध्यमातून प्रचंड मोठं कार्य केलं आहे.
वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सांगली येथील डॉ. पतंगराव कदम मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून हृदयविकार कक्षाचे प्रमुख व प्रोफेसर म्हणून डॉ. आवळेकर दांपत्याने केलेले काम वाखाण्याजोग आहे. समाजातील असंख्य गरीब व उपेक्षित वर्गातील घटकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राचे अनोखे दर्शन घडविले आहे. जयसिंगपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी म्हणून कार्य करत असताना त्यांनी या संस्थेची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला. विविध सामाजिक व वैद्यकीय विषयावर व्याख्याने व ग्रंथ लिखाण करून त्यांनी प्रामाणिक कार्य केला आहे. विविध सामाजिक संघर्ष व लढ्याचे नेतृत्व करीत त्यांनी सामाजिक संवेदनशीलता ही दर्शवली आहे. त्यांनी आपल्या मधुर वाणी व कृतिशील कार्याने पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचा वर्ग निर्माण केला आहे. वैद्यकीय पेशात एकूणच जनसामान्याकडून डॉक्टर्सना देवाची उपमा दिली जाते.सदर उपमा खऱ्या अर्थाने डॉ. आवळेकर दाम्पत्यांना साजेसे आहे. त्यांच्या कार्याला जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने सलाम व पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा