![]() |
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या तोंडात गणेशाचा प्रसाद भरविताना गणेश भक्त आजोबा |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
सातारा : माहुली तालुका सातारा येथील कृष्णा नदीच्या पात्रात गणेश विसर्जन करणाऱ्या भक्तांनी नदी परिसरात व नदी पात्रात सोडलेले निर्माल्य संकलित करण्यासाठी व परिसर स्वच्छता करण्यासाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्रा.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी कचरा गोळा करण्यामध्ये व्यस्त असल्याने त्यांना स्वतःच्या हाताने गणेशाचा प्रसाद खाणे शक्य नसल्याचे एका आजोबांनी ओळखले व चक्क या आजोबांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने प्रसाद भरविला. समाजासाठी चांगले काम करणाऱ्या लोकांची दखल समाजातील लोक घेत असतात याचे हे एक उत्तम उदाहरण असून राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना समाजसेवेचे बाळकडू पाजून समाजाशी एकरूप होण्याचे प्रशिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयातर्फे दिले जात आहे. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा