![]() |
मार्गदर्शन करताना वृक्षमित्र मा.भास्कर शिंदे |
*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संस्कारक्षम मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून वृक्षमित्र श्री भास्कर शिंदे उपस्थित होते. यावेळी प्र.प्राचार्य डॉ.नीतीश सावंत उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात त्यांनी आई वडिलांचा आदर कशा पद्धतीने राखला पाहिजे,आयुष्यात विद्यार्थ्यांनी कश्या पद्धतीने ध्येय ठरवले पाहिजे,आयुष्यात जिद्द कशी असावी,काम कोणतेही असो ते एक नबरच झाले पाहिजे,वृक्षावर सुद्धा आपण संस्कार केल्याने त्यामध्ये सुद्धा बदल कसा घडतो व वाचाल तर वाचाल असा संदेश त्यांनी दिला तसेच पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्राचार्य प्रो. डॉ. नितीश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास उपप्राचार्य श्री बी ए आलदार,कॉम्पुटर विभागप्रमुख श्री बी ए पाटील,श्री कोरे आर आर व ज्युनिअर कॉलेज चा सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.
स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी प्राचार्य अवधूत कोळी याने केले,प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी शिक्षिका कु पद्मावती आरबाळे हिने केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विद्यार्थिनी शिक्षिका कु श्रुती माने हिने केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी शिक्षिका कु तेजोण्मयी बलवान हिने केले . कार्यक्रमाला विदयार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा