![]() |
भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन |
✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक
![]() |
श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन - शिक्षक दिन |
सांगली: आज ५ सप्टेंबर शिक्षण दिनानिमित्त सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे विविध कार्यक्रम घेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवेकशील आणि समाजभान असणाऱ्या पिढ्या निर्माण करणाऱ्या शिक्षकांना घडवणाऱ्या कॉलेजसाठी हा दिवस म्हणजे जणू सोहळाच होता.
![]() |
विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे स्वागत आणि सत्कार |
कार्यक्रमाची सुरुवात फोटोपुजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांकडून ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा पुष्प व श्रीफळ देवून सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थीरुपी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचाही सत्कार व स्वागत करण्यात आले.
यानंतर स्फूर्ती कुलातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी एक समूह गीत सादर केले. यानंतर शिक्षक शपथविधी घेण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक प्रो.डॉ.सुशील कुमार यांनी ही शपथ बी.एड विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली. यानंतर बी.एड प्रथम वर्षातील विद्यार्थी प्रतीक कनवाडे, आकाश जाधव, दिपाली विभुते, स्नेहल आळंदे, वैशाली कोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर आयोजित केलेल्या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली, ज्यामधे श्रीमती रत्नप्रभा तलवार यांनी प्रथम तर श्रीमती स्नेहल गवळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
![]() |
समूहगीत आणि प्रश्नमंजुषा मधील काही क्षण |
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले कॉलेजचे प्राध्यापक श्री दयानंद बोंदर सर यांनी थोडक्यात भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
![]() |
प्रमुख वक्ते प्रा.दयानंद बोंदर |
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते कसे मजबूत करावे, आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी आधी स्वतः कसे आदर्श व्यक्तिमत्त्व बनले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
![]() |
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य.डॉ.बी.पी. मरजे सर |
कार्यक्रमाचे आयोजन स्फूर्ती कुल व त्याच्या मार्गदर्शिका प्रा.मुक्ता पाटील व प्रा.वैशाली गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्य डॉ बी.पी. मरजे तर प्रमुख पाहुणे/वक्ते म्हणून प्रा.दयानंद बोंदर सर लाभले होते. तसेच कार्यक्रमासाठी प्रो.डॉ. सुशील कुमार, प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.डॉ.युवराज पवार, प्रा.गायत्री जाधव आणि बी. एड प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पद्मजा पाटील आणि श्रीमती भाग्यश्री गस्ते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती ऋतुजा चौगुले यांनी तर आभार श्रीमती रेखाताई खरात यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा