Breaking

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

*बदलत्या सामाजिक व शैक्षणिक प्रवाहाला सामोरे जाण्याकरिता शिक्षकांनी सज्ज रहावे : प्रा. बाळगोंडा पाटील*


अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर येथे शिक्षक दिन संपन्न


*सौ.गीता माने : सहसंपादक*


जयसिंगपूर : अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर येथे शिक्षक दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बाळगोंडा पाटील व संस्थेचे संचालक - सीईओ प्रा.अभिजीत अडदंडे उपस्थित होते.

   याप्रसंगी 21 व्या शतकातील शिक्षकाची बदलती भूमिका या विषयावर प्रा. बाळगोंडा पाटील यांनी बदलत्या प्रवाहाला सक्षमपणे सामोरे जाण्याकरिता शिक्षकांनी  तयार असणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन केले.  शिक्षकांशी संवाद साधताना विविध उदाहरणाद्वारे त्यांनी बदलत्या भूमिका स्पष्ट करून सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून  प्रा.अभिजीत अडदंडे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्या सौ. अश्विनी पाटील या होत्या. 

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. तृप्ती पाटील यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे आभार सौ. काजी मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

        शिक्षका विषयी गुरूभाव व आस्था दर्शविणाऱ्या या अनोख्या शिक्षक दिनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा