Breaking

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

*जयसिंगपूर पोलीस ठाणेची यशस्वी कामगिरी ; ३,२५,०००/- किंमतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठे यश*

 

दोन अटल चोरट्यांना जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने केली अटक


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


जयसिंगपूर :  जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल व डंपर चोरीतील दोन आरोपी जेरबंद करुन त्याचेकडुन २,५०,०००/- किंमतीच्या सहा मोटरसायकल व ७५,०००/- रुपये किंमतीचा डंपर असा एकुण ३,२५,०००/- किंमतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.

      जयसिंगपुर पोलीस ठाणेकडे दि. 03/09/2022 रोजी मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषगाने जयसिंगपुर पोलीस ठाणेचे मा.पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शोध पथकास आदेशीत केले प्रमाणे जयसिंगपुर गुन्हे शोध पथक जयसिंगपुर शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हे शोध पथकास माहिती मिळाली की, सदर गुन्हा 1) विनोद बाबु जाधव.व.व. 22, 2) सुनिल रामाप्पा गावडे.व.व. 26 दोघे रा. नांदणी नाका, लमाणी वसाहत, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर, यांना गुन्ह्याचे अनुषगाने ताब्यात घेवुन त्यांचे कडे तपास केला असता त्यांनी वरील दाखल असलेले गुन्हा केलेचे कबुल केले.

    तसेच इतर ठिकाणाहुन 5 मोटर सायकल व जयसिंगपुर पोलीस ठाणे गु र नं 152/2022 भा द वि स क 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील डंपर चोरी केलेबाबत कबुली दिलेने त्यांचेकडुन 2,50,000/- किंमतीच्या 6 मोटरसायकल, जप्त करण्यात आला आहे.

     सदर कारवाई मा. उपविभागीय पोलीस आधिकारी श्री. रामेश्वर वैजणे, जयसिंगपुर विभाग जयसिंगपूर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, जयसिंगपूर पोलीस ठाणे, पोसई प्रमोद वाघ, महिला पोसई स्नेहल टकले, सहा. फौजदार सुरेश कोरवी, म पो हे काँ 260 प्रभावती सावंत, पो हे काँ 806 निलेश मांजरे, पो ना 2514 सुरेश तोडकर, पो काँ 885 संदेश शेटे, पो काँ 1333 रोहित डावाळे, पो काँ 2545 वैभव सुर्यवंशी, पो काँ 2349 सचिन चौगुले, पो काँ 2568 काशिराम कांबळे यांनी केली आहे.

      जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या उत्तम व मोठ्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा