![]() |
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मा. गणपतराव दादा पाटील |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
शिरोळ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना म्हणजे N.m.m.s परीक्षा (इयत्ता आठवी ) मध्ये यशोदीप क्लासेस शिरोळ ने उज्वल यश संपादन केले.
सदर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 12,000/- रुपये असे एकूण चार वर्षे रुपये 48,000/- स्कॉलरशिप केंद्र शासनाची प्रत्येक खालील विद्यार्थ्यास मिळणार आहे .
त्यानिमित्ताने श्री दत्त सहकारी साखर कारखाना लि.शिरोळ चे चेअरमन श्री गणपतराव पाटील (दादा) यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . आदिती अभिजीत गुरव OBC गटातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम , इफ्रा आयुब नालबंद, कौस्तुभ कांबळे, रवी रमेश काळे, यशश्री राजू काळे, पृथ्वीराज दीपक पाटील, व वेदिका रवींद्र जगदाळे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री .गणपतराव पाटील (चेअरमन) यांच्या हस्ते करण्यात आला तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रस्ताविक श्री अमोल गावडे सरांनी केले व आभार श्री राजू काळे सरांनी यांनी मांडले. यानिमित्त चेअरमन साहेबांना सुद्धा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा