Breaking

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

जयसिंगपूर कॉलेज एनसीसीच्या वतीने जागतिक नदी दिवस उत्साहात संपन्न*

 

एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक नदी दिवस संपन्न


*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर  : 25 सप्टेंबर 2022, हा दिवस सर्वत्र जागतिक नदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील एनसीसी विभागामार्फत जनजागृती सायकल रॅली व नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

  जयसिंगपूर कॉलेज एनसीसी विभागाच्या वतीने जयसिंगपूर ते नृसिंहवाडी पर्यंत सायकल रॅली आणि नृसिंहवाडी येथील मुख्य घाटाची स्वच्छता आणि जनजागृतीसाठी गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

    सदर उपक्रमास एनसीसी विभागाचे 81 कॅडेट्स उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख प्रा. सुशांत एस.पाटील यांनी केले. रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे व कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. नितीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. मा.डॉ अडदंडे यांचेहस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमासाठी 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर करणार मा.डी.एस.सायना, कर्नल मा.विजयांत थोरात आदींचे मार्गदर्शन लाभले.

       सदर प्रबोधनात्मक सायकल रॅली व  उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा