![]() |
मार्गदर्शन करताना डॉ. डी के पाटील, प्राचार्य डॉ. सौ.त्रिशला कदम,प्रा. एम.जी.पाटील व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : दारिद्रय निर्मुलनासाठी सरकारी पातळीवर व्यापक नियोजन व ठोस अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. के. पाटील यांनी केले.
इचलकरंजीच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय यांच्यावतीने आयोजित 'भारतातील दारिद्र्याची मीमांसा' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी युनिवर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर व श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानमालेतील चौदावे पुष्प तज्ञ मार्गदर्शक प्राचार्य डॉ.डी.के.पाटील यांच्यामार्फत गुंफण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सौ.त्रिशला कदम होत्या.
यावेळी डॉ.पाटील म्हणाले, देश स्वतंत्र झाला तेव्हा देशातील साक्षरतेचे प्रमाण कमी होते. स्वातंत्र्यानंतर शाश्वत विकास याबाबत नियोजन नव्हते. उद्योगांचा विकास तसेच नव्याने उद्योग उभारणीसाठी भांडवलाची कमतरता होती. कुशल मनुष्यबळाचा अभाव होता. आज देश अमृतमहोत्सव साजरा करत असताना अजूनही दारिद्रय निर्मूलन झालेले नाही. यासाठी केंद्र व राज्य पातळीवर नियोजनबध्द कृती कार्यक्रम करण्याची गरज आहे. यावेळी डॉक्टर सूयेकचे कार्याध्यक्ष प्रा.एम.जी.पाटील यांनी सूयेकच्या कार्यपध्दतीची आणि विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या नवीन योजनेची माहीती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य प्रा. डॉ. त्रिशला कदम यांनी विद्यार्थीनींनी दारिद्रय निर्मूलनाची संकल्पना समजून घ्यावी व गरीबीवर मात करून आपले ध्येय साध्य करावे असे सांगितले. यानिमीत्ताने आयोजित पोस्टर प्रदर्शनाचे उद्धघाटन प्रा.एम. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुयेकचे अध्यक्ष प्रा. डॉ. राहुल शंकर म्होपरे यांचा शुभ संदेश वाचण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले. सूत्रसंचालन कु. प्रियांका सागर व ऋतुजा हरसुरे यांनी उत्तम पद्धतीने केले.आभार प्रा. स्वप्नील वाकडे यांनी मानले. यावेळी प्रा. स्नेहल पवार उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा