Breaking

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

*टाकळीवाडीत सैनिक वेल्फेअर असोसिएशन वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न*


टाकळीवाडीत सैनिक वेलफेअर असोसिएशनचा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न


टाकळीवाडी   : नामदेव निर्मळे


 टाकळीवाडी  : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे दि.  02/10/2022 रोजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन चा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.टाकळीवाडी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष ऑनरेरी कॅप्टन रमेश निर्मळे यांनी या संस्थेची स्थापन केली.

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री राजू जुगळे व सौ.रूपाली जुगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भवानीसिंग घोरपडे सरकार आणि इचलकरंजीचे पोलीस निरीक्षक मा.राजू तहसीलदार होते.तसेच शिरोळ तालुका महिला संघटना अध्यक्ष श्रीमती नंदा खरात या होत्या. श्री सुरेश बदामे, माजी सुभेदार केंदबा कांबळे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष मा. दादा खोत, गोपाल निर्मळे, महादेव बदामे, समीर आरकाटे व इतर माजी सैनिकांनी  कार्यक्रमाचे नियोजन केले.

    सैनिकांच्या महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिला संघटना  कार्यकारणी निवड करण्यात आली अध्यक्ष सौ रुक्मिणी निर्मळे, उपाध्यक्ष आशा बदामे, सचिव अंकिला आरकाटे, खजिनदार सौ जयश्री निर्मळे, सल्लागार सौ रुपाली जुगळे, संघटक पुनम निर्मळे यांची निवड करण्यात आली.

   आभार माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे यांनी केले. यावेळी गावचे सरपंच मंगल बिरणगे गावातील सर्व आजी-माजी सैनिक ,सर्व ग्रामस्थ सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा