![]() |
व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. एल.एन.घाटगे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
*वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात अर्थशास्त्रातील रोजगार संधी या विषयावर व्याख्यान*
तासगाव : विद्यार्थ्यांनी आपल्यातील टॅलेंट ओळखावे , व्हिजन ठेवून अभ्यास करा नियोजनबद्ध अभ्यासाच्या माध्यमातून अर्थशास्त्रात करिअर करता येते असे उद्गार डी.जी.कॉलेज सातारा येथील माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख *डॉ.एल.एन. घाटगे* यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अर्थशास्त्र विभाग ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अर्थशास्त्रातील रोजगार संधी या विषयावरील सुएक विशेष व्याख्यानमालेतील दहाव्या व्याख्यानात बोलताना काढले.
डॉ. घाटगे पुढे म्हणाले एमपीएससी , यूपीएससी व बँकिंग क्षेत्रामध्ये अर्थशास्त्राच्या माध्यमातून करिअर करता येते. अर्थशास्त्राचा वापराने शेती आधुनिक करून व्यवसायिकता साधता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सुयेकचे कार्याध्यक्ष प्रा.एम.जी पाटील यांनी आपल्या मनोगतातून अर्थशास्त्राचे महत्व विशद केले. *सुयेकचे विद्यमान अध्यक्ष डॉॅ.राहुल शं.म्होपरे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.*
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय राबवत असलेल्या योजना सांगितल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख उपप्राचार्य जे.ए.यादव यांनी केले. पाहुण्यांचे परिचय डॉ. के.एन.पाटील यांनी करून दिला तर आभार डॉ.बी.जे.कदम यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला सुयेकचे माजी अध्यक्ष डॉ.ए. एस.महाडिक ,मराठी विभागप्रमुख डॉ.शहाजी पाटील ,राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.विजयसिंह जाधव , प्रा.अमित माळी यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा