![]() |
मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मा. विजयराज मगदूम |
भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : येथील डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट संचलीत डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलला 'बेस्ट होमिओपॅथिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबईतील राज्यपाल भवनमध्ये हा सोहळा पार पडला. कोरोनाच्या काळात हॉस्पिटलने दातृत्व भावनेतून रुग्णांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचेही गौरवउद्गार यावेळी काढण्यात आले. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यभरातून होमिओपॅथी, अलोपॅथी, नर्सिंग, मल्टीस्पेशालिटी, कोविड, केअर अशा विविध विभागात विशेष काम केलेल्या संस्थाना पुरस्कार देण्यात आला.
यामध्ये १९९० साली स्थापन झालेल्या डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा समावेश आहे. गेली ३० वर्ष ही संस्था गोरगरीब सामान्य रुग्णांना आरोग्य सेवा पुरवत आहे. कोरोना कालावधीत ही या संस्थेने उत्कृष्ट काम केले आहे. जेष्ठ संपादक निमिष माहेश्वरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा