![]() |
शिवाजी विद्यापीठ निवडणूक लढवण्यासाठी शिव-शाहू आघाडी |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध मंडळाच्या निवडणूका दि.१४ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहेत. ही निवडणूक यशस्वीपणे लढविण्यासाठी विविध घटकांकडून आघाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक मधील पदवीधर मतदार संघातील १० जागावर निवडणूक लढविण्यासाठी 'शिव -शाहू आघाडी' स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना, ऑल इंडिया युथ स्टुडंट फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ़ इंडिया या संघटनांचा समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठाचा सर्व कारभार हा विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या हितासाठी पारदर्शी व स्वच्छ व्हावा हा शिव-शाहू आघाडीचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा आणि त्यांचे निकाल वेळेवर लावणे, विद्यापीठाचा कारभार भ्रष्टाचार विरहित असणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या आवश्यक सर्व भौतिक सुविधांचा विस्तार, विद्यापीठाच्या सर्व संसाधनांचा पर्याप्त वापर करणे, विद्यापीठाची स्वाययत्ता अबाधित राहणे. नविन शैक्षणिक धोरणातील सर्व सामान्य विद्यार्थी विरोधी तरतूदीना विरोध, शिक्षणाचे खाजगीकरण व नफेखोरीत विरोध, विद्यार्थीवरील भरमसाठ फी-वाढीच्या धोरणाला विरोध, विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा कायमस्वरूपी भरणे, महाविद्यालयांच्या एकत्रीकरणास विरोध तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेची व संविधानातील मूल्यांची जपणूक शिवाजी विद्यापीठात व्हावी यासर्व मुद्द्यावर शिव-शाहू आघाडी निवडणूक लढविणार आहे. या नव्या शिव शाहू आघाडीमुळे पदवीधर सिनेटची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तीविण्यात येत आहे. यामुळे सध्या तरी ही निवडणूक काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. यामुळे सुरुवातीपासून अस्तित्वात असलेल्या आघाडीला ही निवडणूक सहजपणे जिंकता येण्याची शक्यता मावळली असल्याबाबत बोलले जात आहे.
मतदार आमच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आमचे पूर्ण पॅनल निवडून देतील असा आत्मविश्वास या पॅनलच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
या शिव शाहू आघाडीसाठी सध्याचे निमंत्रक...
मा.संजय पवार (जिल्हा प्रमुख शिवसेना)
मा.विजय देवणे (जिल्हा प्रमुख शिवसेना)
मा.मनजीत माने (युवासेना जिल्हा युवाअधिकारी)
प्रा. सुधाकर मानकर ( सुटा विश्वस्त)
प्रा.डॉ.डी.एन. पाटील ( सुटा प्रमुख कार्यवाह),
प्रा. डॉ. गजानन चव्हाण (सुटा कोल्हापूर खजिनदार) व
गिरीश फोंडे (राष्ट्रीय परिषद सदस्य ए. आय. एस.एफ)
प्रशांत आंबी (राज्य सेक्रेटरी ए. आय. एस. एफ)
जावेद तांबोळी (राज्य सेक्रेटरी ऑल इंडिया युथ फेडरेशन)
राजेश वरक (प्रतिनिधी एस.एफ.आय)
धीरज कवाळे (प्रतिनिधी एस.एफ. आय)
प्रफुल्ल पाटील (प्रतिनिधी एस.एफ.आय)
अधिक माहितीसाठी डॉ, डी. एन. पाटील 7588065242, गिरीश फोंडे 9272515344, मंजित माने - 8308645252 तसेच सुटाच्या वेबसाईटवर sutaofficekolhapur@gmail.com संपर्क करण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा