Breaking

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

श्री गुरुदत्त शुगर्स चे कार्य शेतकरीभिमुख - ना. चंद्रकांतदादा पाटील. १९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ, एकरकमी एफआरपी देणार - माधवराव घाटगे




=========================

टाकळीवाडी/ नामदेव निर्मळे

                श्री गुरुदत्त शुगर्स व माधवराव घाटगे यांनी शेतकरी हा केंद्रस्थानी ठेऊन शेतकरी हित जोपासले आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्यामुळे श्री गुरुदत्त शुगर्स हा शेतकरीभिमुख असल्याचे गौरोउद्धगार राज्याचे उच्चतंत्र, वस्त्रोउद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स च्या १९ व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर होते.



      पुढे बोलताना नामदार म्हणाले खाजगी साखर कारखानदारातील उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सहकारी साखर कारखानदारीतील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य व सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम मिलाफ घडवून महाराष्ट्रातील यशस्वी कारखानदारीचे रोल मॉडेल म्हणून श्री गुरुदत्त शुगर्सकडे पाहिले जाते.विविध प्रयोगांची साथ देत परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्री गुरुदत्त च्या या प्रयत्नातून माधवराव घाटगे यांनी साखर कारखानदारीचे अर्थकारण व समाजकारण यांचा उत्तम मिलाफ घातला आहे.



     यावेळी महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांनी गुरुदत्त शुगर्स च्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी उच्चांकी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार व शेतकऱ्यांसाठी चालु केलेल्या गुरुदत्त किसान कार्ड योजने अंतर्गत वैद्यकिय विम्याचा धनादेश सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाला गुरुदत्त चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, धीरज घाटगे, संचालक-संजयकुमार गायकवाड, बाळासाहेब पाटील, मराठा संघाचे सुरेशदादा पाटील, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष- रामचंद्र डांगे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अशोकराव माने, विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज यादव, शिरोळ पं.स चे माजी उपसभापती भवानीसिंग घोरपडे, मयुर चे डायरेक्टर ॲड.सुशांत पाटील, भाजपा किसान मोर्चा चे कोषाध्यक्ष अन्वर जमादार, टाकळीवाडीच्या सरपंच मंगल बिरणगे, टाकळीच्या सरपंच हर्षदा पाटील,अकिवाटचे सरपंच विशाल चौगुले, हेरवाडचे सरपंच सुरगौंडा पाटील,चिंचवाडचे माजी सरपंच विठ्ठल घाटगे, दत्त नागरी पत संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख, भाजपाचे मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर , ऊस उत्पादक शेतकरी, परिसरातील विविध गावचे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गुरुदत्त शुगर्स, दत्त नागरी पत संस्था, कै. भगवानराव घाटगे सेवा सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. आभार गुरुदत्त चे संचालक बबन चौगुले यांनी मांडले.

 ---------------------------------------------


गुरुदत्त शुगर्स एकरकमी एफआरपी देणार - माधवराव घाटगे .


गळीत हंगाम शुभारंभ  कार्यक्रमात बोलताना चेअरमन श्री. घाटगे म्हणाले , गुरुदत्त ने मागील १८ वर्षात ऊस उत्पादक शेतकरी ,तोडणी मजुर, वहातुकदार, कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठबळावर गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. उच्चांकी ऊस दर ही गुरुदत्त ची परंपरा असून गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा यावेळी श्री. घाटगे यांनी केली. शेतकऱ्यांनी नोंद केलेला सर्व ऊस गाळपास कारखान्याला पाठवावा असे आवाहन ही श्री. घाटगे यांनी यावेळी केले.

 ----------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा