Breaking

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

*जयसिंगपुरात दसऱ्याच्या मुहूर्तावर पालखी मिरवणुकीतील भक्तांना व नागरिकांना मोफत सरबत वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी*

 

मा.राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक जयसिंगपूर ,पत्रकार राजू मांजर्डेकर व अन्य मान्यवर सरबत वाटप करताना


*विवेक कांबळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  मधील स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रम राबविले जातात, यावर्षीही दसऱ्या दिवशी जयसिंगपूर मधील नागरिकांना मोफत शरबत वाटप कार्यक्रम जयसिंगपूर मधील क्रांती चौकात करण्यात आला दसऱ्या दिवशी जयसिंगपूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी जयसिंगपूर मध्ये मंदिरा पासून निघते ही पालखी सिद्धेश्वर मंदिरापासून पूर्ण जयसिंगपूर शहरांमध्ये मार्गक्रमण करते,दर्शनाचा लाभ घेण्यासाठी असंख्य भाविक जयसिंगपूर मध्ये दाखल होतात त्यामुळे या भाविकांना शरबत पिण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सोय करण्यात आली,

     यावेळी राजेंद्र मस्के साहेब पोलीस निरीक्षक जयसिंगपूर, अण्णासाहेब पाटील ( चेअरमन),इक्बाल इनामदार  पत्रकार, मेहबूब सय्यद पत्रकार, राजू मांजर्डे कर पत्रकार, प्रकाश पवार सामाजिक कार्यकर्ते,  सचिन मोटे त्याच बरोबर,आयोजक एजाज मुजावर संस्थापक अध्यक्ष,सुरेश राठोड उपाध्यक्ष,विजय मस्के, बबलू शेख,विजय कारंडे, रोहित जाधव,ए एस ऐनापुरे सर यांच्या सर्व टीम कडून करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा