![]() |
शाहूवाडीतील धनगर वाड्यावर दिवाळीचा फराळ वाटप करताना |
टाकळीवाडी :- नामदेव निर्मळे
*कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम अश्या सुकामाळ धनगर वाड्यावर दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
लक्ष्मी पूजन हा दिवाळीतील महत्त्वाचा सण या दिवशी प्रत्येक घरात पूजेची लगबग असते. या लगबगीत सरकार युथ फाऊंडेशन चे सदस्य दिवाळी फराळ घरोघरी जाऊन जमा केला.जवळपास रात्री 1 वाजेपर्यंत हा सर्व फराळ पॅक करून सकाळी सहा वाजता सुकामाळच्या दिशेने रवाना झाले.
अडीच तासांचा प्रवास करून ते वाड्याच्या पायथ्याशी पोहचले. जवळपास दोन पोती फराळ खांद्यावर घेऊन 4 किमी डोंगर चढत सुकामाळ वाड्यावर पोहचले. या कामात महेश गवंडी, कौमुदी गवंडी,विश्वजित इंगळे,शेखर ढवळे,मनोज कागले,अवधूत घाळी, गिरीश नरुटे या तरुणांनी मोठे कष्ट घेतले.तिथे पोहचल्यावर वाड्यावरील सर्व घरात दिवाळीचा फराळ वाटप केला. नंतर वाड्यातील मुलांना शाळेत बोलावून सर्व मुलांना मनसोक्त फराळ खाऊ घातला. हा फराळ खाताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.तो पाहिल्यानंतर एवढा प्रवास आणि तासभर चालत आलेला थकवा कुठच्या कुठे पळून गेला.आमच्या इथे सर्व लोक दिवाळीच्या झगमगाटात एकमेकाच्या इर्षेने दिवाळी साजरी करतात.पण अजूनही हि लोक ना दिवाळीचा डामडौल,ना दिवाळीचा फराळ,ना स्पर्धा, असे चित्र पाहायला मिळाले.
या सर्व उपक्रमात हिरीरीने भाग घेतला तो विश्वजित इंगळे, शेखर ढवळे, महेशकुमार गवंडी यांनी आणि या साठी साथ दिली ती सर्व सरकार युथ फाऊंडेशनच्या सदस्यांनी याचं खूप खूप कौतुक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा