Breaking

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

घोसरवाड मध्ये गरिबा घरची दिवाळी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न...

 

घोसारवाड मध्ये गरीबा घरची दिवाळी उपक्रम साजरा


टाकळीवाडी  :- नामदेव निर्मळे


घोसरवाड  :   संपूर्ण जग कोरोना मुळे आर्थिक महामंदीत सापडलं होत तेंव्हा हा काळ सर्वानाच कठीण होता. अशातच तोंडावर दिवाळी आली असताना घोसरवाड गावातील आत्माराम वडर व अभिजित बारवाडे यांच्या संकल्पनेतून*स्मार्ट घोसरवाड* या व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून व गावातील नागरिकांच्या वर्गणीतून गरीबांघरची दिवाळी हा उपक्रम सुरू केला.

     या उपक्रमांतर्गत गावातील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ, साहित्य व कपडे वाटप करण्यात येत आहे.गेले दोन वर्ष मोठ्या प्रतिसादात व गराजुंच्या आशीर्वादात सुरू असलेला हा उपक्रम याही वर्षी मोठ्या उत्साहात राबवण्यात आला.या उपक्रमास गावातून तसेच बाहेर गावातूनही लोकांनी मोठा प्रतिसाद देत वर्गणी जमा केली व जमा झालेल्या वर्गणीतून गावातील 45 कुटुंबांना दिवाळी गिफ्ट किट वाटप करण्यात आले.

      या किट मध्ये साडी, शर्ट , टॉवेल, लाडू ,चिवडा, चकली, शंकरपाळी, मोती साबण, तेल, शाम्पू, उठणे, पणती, पावडर डबा, 2023 दिनदर्शिका, अगरबत्ती, लहान मुलांना कपडे अशा अठरा प्रकारचे साहित्य होते.

    अशा किटचे प्रत्येकाच्या घरी जाऊन वाटप करण्यात आले.त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत स्मार्ट घोसरवाड या व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून सुरू केलेल्या उपक्रमाचे गावातून तसेच परगावातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा