![]() |
सुयेक व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. सौ.व्ही.पी कट्टी |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : सुयेकच्या वतीने शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, विद्यार्थी व अन्य घटकांना अर्थशास्त्र विषयाचे अद्यावत ज्ञान पूर्णपणे आत्मसात व्हावे. अर्थशास्त्रीय वैचारिक शिदोरीच्या माध्यमातून सर्व घटक सक्षम व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून कमला कॉलेज मधील अर्थशास्त्र विभाग व शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन (सुयेक) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानमालेतील ११वे व्याख्यान पुष्प गुंफण्यात आले. या व्याख्यानाच्या प्रमुख वक्त्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.सौ. व्ही. पी. कट्टी या होत्या. या व्याख्यानाला ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
डॉ.सौ. व्ही.पी. कट्टी यांनी आपल्या व्याख्यानात ' वित्तीय क्षेत्रातील तांत्रिक क्रांती ' या विषयावर आपले मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात वित्त पुरवठ्याचेच महत्व , राष्ट्रीय विकासात ग्रामीण व शहरी बँकांची भूमिका, डिजिटल बँकिंग, ऑनलाईन बँकिंग यांचे फायदे व हे व्यवहार करीत असताना घ्यावयाची काळजी यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. जे. एफ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठात नव्याने सुरू झालेल्या B.Sc. व M.Sc. इन इकॉनॉमिक्स या अभ्यासक्रमाचे महत्व सांगितले तसेच सातत्याने नाविन्याचा शोध घेणे का महत्त्वाचे असते याचे विवेचन केले. कार्यक्रमास उपस्थित असणारे सुयेक चे अध्यक्ष डॉ. राहुल शंकर म्होपरे यांनी सूयेकची कार्यपद्धती विशद करून विद्यार्थिनींना संशोधन लेख लिहावा यासाठी प्रोत्साहन दिले.
कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सौ. तेजस्विनी मुडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तंत्रज्ञान विषयक प्रगतीचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा महत्वाचा आहे हे विशद केले. कार्यक्रमाला ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास सूयेक चे कार्याध्यक्ष प्रा.एम.जे.पाटील व सूयेक कार्यकारिणी मंडळाचे सदस्य डॉ. सुभाष कोंबडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नम्रता निकम यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. हेमलता मिणचेकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनकर कबीर यांनी केले. प्रा.उदयकुमार इनामदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. उदय आठवले व अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा