Breaking

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

*सैनिक टाकळीत "एक दिवा लाऊ शौर्याचा "दीपोत्सव उत्साहात साजरा*

 

सैनिक टाकळीत एक दिवा लावू शौर्याचा उपक्रम उत्साहात संपन्न


सैनिक टाकळी : -नामदेव निर्मळे  

    

  सैनिक टाकळी :   पाच वर्षांपूर्वी टाकळीची कन्या  सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी पाटील यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच अमर जवान स्मारक येथे दिवाळी ते भाऊबीज दीपोत्सव करण्यास सुरुवात केली. तीच परंपरा  पुढे सातत्याने चालू आहे. 

     आरंभ फाउंडेशन संस्थेचे अध्यक्षा प्रास्ताविक करत असताना म्हणाल्या, "मला माझ्या सैनिकी गावचा सार्थ अभिमान आहे.ज्यांच्या मुळे आज आपली संस्कृती वाचली अशा छत्रपती शिवाजी महाराज तसेच शहीद जवान, भारतीय जवान,पोलिस बांधवांमुळे आम्ही सुरक्षित , शांतते, उत्साहात, आनंदाने सण साजरे  करत असतो. अशा आपल्या राजांना ,जवानांना कृतज्ञपूर्वक, स्नेहभावनेने शौर्य दिवा समर्पित करणे  हे आमचे कर्तव्य मानतो. आज आरंभ फाउंडेशन सैनिक टाकळी टीम सातत्याने ही परंपरा पुढे नेत आहे. याचा आम्हास साथ अभिमान आहे.


      सैनिक समाज कल्याणचे माजी अध्यक्ष लेफ्टनंट बी. एस .पाटील यानी आरंभ फाउंडेशन टीमचे कौतुक करत म्हणाले, आम्हा सैनिकांबद्दल  भावना व्यक्त करून ,जाणीव ठेवून सातत्याने पाच वर्षे दीपोत्सव उपक्रम चालू ठेवला आहे याचे  आम्हास कौतुक  आहे.तसेच सर्व तरुणांनी प्रेरणा घेऊन देश सेवेसाठी कार्य करावे.


        शिवतीर्थ येथे दीपोत्सव करून,आजी-माजी सैनिकांचे भाऊबीज निमित्त औक्षण करण्यात आले तसेच संस्थेच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील आणि विनायक पाटील यांच्या हस्ते स्मारकास  पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. सैनिकांचा रोपे देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळेस सैनिक समाज कल्याणचे अध्यक्ष श्री.आनंदराव पाटील, चंद्रकांत भोसले ,अनिल बाबर, विजय पाटील,विलास पाटील,वसंत गायकवाड,अमर पाटील, विनायक पाटील,नरेंद्र गायकवाड, नवनाथ खंडागळे , अभिजित वासमकर, सिद्धेश गायकवाड, नीरज गायकवाड,  साहिल वासमकर, सुदेश पाटील, अनुराग पाटील, आदित्य पाटील शिवराज पाटील, विजयमाला गायकवाड, मेघा पाटील,सुनिता पाटील, निकिता गायकवाड ,नम्रता गायकवाड, तेजस्विनी रजपूत, साक्षी गायकवाड, श्रावणी पाटील, सई गायकवाड, सृष्टी पाटील आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ  , तरुण ,महिला, मुले दीपोत्सवास उपस्थित होते.

     या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा