![]() |
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मा.शिक्षण संचालकांची भेट |
प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
*बुद्धिवंतांची मुस्कटदाबी करू नका; आंदोलनकर्त्यांचा निर्वाणीचा इशारा...*
पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद असून त्यामुळे नेट सेट पीएचडी या उच्च पदव्या घेऊन बेरोजगारीत दिवस कंठीत असणाऱ्या तरुणांची सहनशीलता संपली आहे; दरम्यान, सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी राज्यभरात आंदोलन पुकारले असून (दि.२७)पासून पुणे उच्च शिक्षण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाने सुरुवात झाली आहे.
नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समिती ऐन दिवाळीत रस्त्यावर आली आहे.नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने ऐन दिवाळीत उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन ०३ व संघर्ष पदयात्रा दि. २७ ते २९ ऑक्टोबर २०२२ पुकारलेले आहे.
*संघर्ष समितीच्या सदस्यांनी पुढील मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.*
१) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १००% सहायक प्राध्यापक भरती झाली पाहिजे.
२) वेठबिगारीचा पुरस्कार करणारे तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन मिळाले पाहिजे.
३) सुरू असलेली प्राध्यापक भरती (२०८८) गतीमान करून पुढील १००% सहायक प्राध्यापक भरती सुरू करावी.
४) विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नेमणूक करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा