Breaking

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

*राज्यस्तरीय स्पर्धेत जयसिंगपूरच्या अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे चमकदार कामगिरी*

 

अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलचा सुयश


*प्रा. माधुरी कोळी : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : कला भारती बालकला संस्था औरंगाबाद यांच्याकडून घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय हस्ताक्षर ,निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धेमध्ये अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे.


     या स्पर्धेमध्ये 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यातील 24 विद्यार्थ्यांना बालक रत्न पुरस्कार एका विद्यार्थिनीस ज्ञानगंगा पुरस्कार* मिळालेला आहे त्याचप्रमाणे  एका विद्यार्थ्यास *उत्तेजनार्थ चांदीचे पदक मिळालेले आहे. तसेच अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलला क्रियाशील शाळा पुरस्कारमुख्याध्यापकांना *द्रोणाचार्य पुरस्कार* संस्थेकडून प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे कलाशिक्षक सौ साक्षी चौगुले यांना क्रियाशील कलाशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

    राज्यस्तरावरील या स्पर्धांमध्ये मिळालेले यश हे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अभिमानास्पद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा