![]() |
प्रा.संजय ठिगळे यांना आर्थिक लेखन विषयक पुरस्कार प्रदान करीत असताना डॉ. एस.बी.बजाज आणि डॉ. विनायक गोविलकर त्यांच्यासमवेत डॉ. आर. बी भांडवलकर, डॉ.प्रा.डॉ. मारुती तेगमपुरे, इ.मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वृत्तपत्रीय अर्थविषयक लेखनासाठी प्रा.सौ.अरुणा रारावीकर आर्थिक लेख पुरस्कार भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे यांना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर व प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज यांच्या हस्ते जालना येथे संपन्न झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४५ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला.प्रा.संजय ठिगळे यांच्या 'चौकटीबाहेरच्या निर्णयांची गरज' या लेखाची दखल घेऊन मराठी अर्थशास्त्र परिषदेने सदरचा पुरस्कार दिला आहे.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलताना डॉ. विनायक गोविलकर म्हणाले की, प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच चालू आर्थिक परिस्थितीवर साध्या आणि सोप्या भाषेत वृत्तपत्रामध्ये आर्थिक विषयावर लिखाण करावे. आर्थिक लेखणामुळे अर्थसाक्षरता निर्माण होण्यास मदत होते.
कार्यक्रमास मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर.बी.भांडवलकर, कार्यवाह खजिनदार प्रा.डॉ.मारुती तेगमपुरे, कार्याध्यक्ष डॉ.अविनाश निकम , संपादक डॉ.राहुल म्होपरे इ.मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल भावना व्यक्त करताना प्रा. ठिगळे म्हणाले की, आपण ज्या समाजातून आलो. त्या समाजाचे देणे लागतो या भावनेतून मी अर्थशास्त्रासारखा अवघड विषय साध्या आणि सोप्या पद्धतीने वृत्तपत्रांच्या माध्यमातून लिहीत गेलो त्यामुळे सदरचा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम,भारती विद्यापीठाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. व्ही. वाय. कदम, अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि साहित्यिक मित्रांनी प्रा संजय ठिगळे यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमास प्रा. सुभाष दगडे, प्राचार्य डॉ. जे. एस.पाटील, प्रा.बळवंत कोरे, इ.मान्यवर उपस्थित होते.
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा