![]() |
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे,शिरोळ गुन्हे शोध पथक |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
शिरोळ : ट्राॅली चोरीतील दोन संशयितास 36 तासाचे आत कडेगाव ता.कडेगाव जि.सांगली येथून शिताफीने जेरबंद करून 16 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात शिरोळ गुन्हे शोध पथकास यश आलेले आहे.
याबाबत अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की,श्री बाबासो आण्णा शेट्टी यांनी त्यांचे ताब्यात असलेली अंदाजे 4 लाख रूपये किंमतीच्या साईराज ट्रेलर्स कंपनीच्या, शिरोळ गावच्या हद्दीतील जमीन गट नंबर 2845 चे शेताजवळ रोडलगत लावलेल्या दोन ट्राॅल्या दि. 05/11/2022 रोजी 21.00 वा ते दिनांक 06/11/2022 रोजी स.06 वाजणेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीयांच्या संमती शिवाय,लबाडीच्या ईरादयाने चोरून नेलेबाबत फिर्याद दिलेने संबंधित शिरोळ पोलिसांनी, गु.र.नं.224/2022 नेआय .पी.सी.कलम 379 नुसार गुन्हा दाखल केलेला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत मा. पोलीस निरीक्षकसो मा.दत्तात्रय बोरीगिडडे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना योग्य त्या सूचना देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सांगीतले होते.त्याप्रमाणेच सदर गुन्ह्याबाबत गुन्हे शोध पथक तपास करीत असतानाच शिरोळ, मिरज, सांगली, पलूस जि सांगली येथे सी. सी. टीव्ही फूटेज च्या सहाय्याने तपास करून सदर गुन्ह्यातील संशयित नामे 1)गणेश धनाजी माळी वय वर्ष 24 आणि 2)सोमनाथ गजानन माळी दोघेजण रा.माळवाडी कडेगाव ता कडेगाव जि सांगली यांना सापळा रचून शिताफीने जेरबंद करण्यात पोलीसांना यश आलेले आहे.आरोपींकडे केले गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा दोघांनी मिळून केलेची कबूली दिली आहे.त्यांचेकडून चोरीस गेले साईराज ट्रेलर्स कंपनीच्या दोन ट्राॅल्या व गुन्हयात वापरलेला फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण 16 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.कॉ. राजाराम पाटील हे करित आहेत.
सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, मा.जयश्री गायकवाड अपर पोलीस अधिक्षक, मा.रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपुर विभाग जयसिंगपुर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे, पोलीस अंमलदार राजाराम पाटील, ताहीर मुल्ला, रहीमान शेख या पथकाने केलेली आहे.सदरची कारवाई ही सर्वात मोठी कारवाई समजली जात असून शिरोळ पोलिसांच्या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा