Breaking

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

*विद्यापीठ निवडणुकीत शिक्षक गटात सुटाचा वरचष्मा ; नोंदणीकृत पदवीधर सिनेटवर विकास आघाडी*


शिवाजी विद्यापीठ निवडणूक 2022 निकाल


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : - शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळाच्या दि.14 नोव्हेंंबर, 2022 रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकांची मतमोजणी काल दि.16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात आली.  ती आज गुरूवारी दि.17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पूर्ण झाली. 

    विद्यापीठ अधिविभागातील शिक्षकांची मतमोजणी पूर्ण होऊन त्यांचा निकाल काल सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला.  त्यानंतर, विविध अभ्यास मंडळांची मतमोजणी पूर्ण झाली.  सर्व 33 केंद्रांवरील मतपेटयांमधील मतपत्रिकांचा हिशेब लावून दुपारी तीन वाजता विद्यापरिषद मतमोजणीला सुरूवात झाली.  विद्यापरिषदेवर विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या खुल्या जागेवर प्रा.डॉ. निमट राजेश काशिनाथ यांची निवड झाली तर मानव्यविद्या शाखेतील खुल्या जागेवर प्रा.डॉ.पाटील पोपट महादेव यांची तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर प्रा.डॉ.बनसोडे सुनिल बापू तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या खुल्या जागेवर प्रा.डॉ.चव्हाण सुनिल दत्तात्र्यय यांची निवड झाली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या जागेवर प्रा.डॉ. सपकाळे जगदीश भागवत यांची तर वाणिज्य विद्याशाखेच्या महिला प्रवर्गाच्या जागेवर प्रा.डॉ. मैंदर्गी वर्षा विवेकानंद यांची बिनविरोध निवड झाली.  

      अधिसभेच्या खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांची दीर्घकाळ चाललेली मतमोजणी पूर्ण झाली.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडीमध्ये प्रा. डॉ.पाटील दत्तात्र्यय निळकंठ,प्रा.डॉ. ढमकले रघुनाथ दिगंबर, प्रा.डॉ.खरात प्रशांत कृष्णराव,प्रा.डॉ. गुजर मनोज दशरथ आणि प्रा.डॉ.वरेकर निवासराव अधिकराव हे निवडून आल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जाहीर झाले.  या गटाची मतमोजणी आठ तास चालली.

भटक्या व विमुक्त प्रवर्गाच्या जागेवर प्रा.डॉ.काळे ज्ञानदेव साळू,अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव जागेवर प्रा. डॉ.सातपुते बबन शंकर आणि इतर मागास प्रवर्गाच्या जागेवर प्रा.डॉ.कुंभार प्रकाश गणपत हे थेट लढतीत विजयी झाले.

   नोंदणीकृत पदवीधरांची मतमोजणी मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे सुरू झाली.  त्यामध्ये इतर मागास प्रवर्गाच्या जागेवर मिठारी अभिषेक राजेंद्र, अनुसूचित जातीच्या जागेवर कांबळे रतन बापू आणि भटक्या व विमुक्त प्रवर्गाच्या जागेवर राजपूत अमरसिंग चंदरसिंग हे विजयी झाल्याचे घोषित झाले.  

   नोंदणीकृत खुल्या प्रवर्गाच्या मतांची मोजणी दि.17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.  त्यामध्ये खाडे विष्णू दत्तात्र्यय यांनी सर्वप्रथम कोटा पूर्ण केला नंतर जाधव अमित पांडुरंग यांनी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला.  उर्वरीत 3 जागांवरील निवडीसाठी मतमोजणी सायंकाळी सातपर्यंत सुरू होती.  अखेर सात वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केला.  त्यानुसार, खाडे विष्णू दत्तात्र्यय, जाधव अमीत पांडूरंग, परूळेकर श्वेता शिवाजीराव, पाटील अजीत रघुनाथ आणि परूळेकर स्वागत गोपालकृष्ण हे निवडून आले.  

    अधिसभेवर निवडून द्यावयाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शिक्षक जागेवर प्रा.डॉ.बोथीकर शिवाजी केरबा तर महिलांसाठी राखीव जागेवर प्रा. सौ.पटेल शाहीन अब्दुलअजी या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.  

   नोंदणीकृत पदवीधरांच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील भिसे लोभाजी तातेराव आणि महिला प्रवर्गातील पवार उषा प्रदीप या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.

   संस्था चालक आणि प्राचार्य प्रवर्गातून एकाही पदाची निवडणूक झालेली नाही.  सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. यामध्ये पाटील अरूण भगवान, पाटील सर्जेराव रघुनाथ, पाटील वसंत मारूती, सावंत बापूसाहेब श्रीहरी, केंगार सुर्यकांत बापू, शेजवळ राजेंद्र विश्वनाथ आणि मुढेकर तेजस्वती बाजीराव यांची बिनविरोध निवड झाली तर अनुसूचित जमाती आणि भटक्या व विमुक्त प्रवर्गाच्या जागा रिक्त राहिल्या.  त्याचप्रमाणे, अधिसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागातील खुल्या प्रवर्गाच्या चार जागांवर कुलकर्णी अमित अशोक, पाटील प्रकाश पांडुरंग, पाटील पृथ्वीराज संजय, पाटील वैभव सदाशिवराव यांची निवड झाली.  तर महिलांसाठी राखीव जागेवर मोरे मंजिरी अजित यांची निवड झाली.  अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा