Breaking

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर प्रो.डॉ.प्रभाकर माने यांची निवड

 

प्रो.डॉ.प्रभाकर माने 



कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथे १४ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.प्रभाकर तानाजी माने यांची सदस्यपदी निवड झाली आहे.

     प्रो.डॉ.प्रभाकर माने यांना शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे ( सुटा ) उमेदवारी मिळाली होती. प्रा.माने यांना अर्थशास्त्र विषयातील शैक्षणिक २० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी अर्थशास्त्रात बरेच संशोधन केले आहे तसेच अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध केले आहेत. त्याबद्दल त्यांना अर्थशास्त्र पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. त्यांनी सुयेक संघटनेत कार्यकारी संघटक म्हणूनही कार्य केले आहे. 

     प्रा.डॉ.प्रभाकर माने हे सध्या सुटा मधे मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच जय हिंद न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक देखील आहेत. या माध्यमातून ते अनेक सामाजिक कार्यदेखील पार पाडत असतात. ते अर्थशास्त्र तसेच अनेक सामाजिक व्याख्याने देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा