![]() |
मा.अशोक स्वामी पोवाड्याच्या माध्यमातून संविधानाचा जागर करताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेजमध्ये जागर संविधानाचा हा व्याख्यानपर कार्यक्रम संपन्न झाला. सुनील स्वामी यांनी संविधानाचा प्रेरणादायी जागर केला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोक शिरगुप्पे व प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. धवल पाटील होते.
भारतीय संविधान दिना निमित्त जयसिंगपूर कॉलेजच्या राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व नँक आयक्यू एसी यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आपल्या टीमसह मा.सुनिल स्वामी यांनी व्याख्यान पर अभंग व पोवाडा च्या माध्यमातून भारतीय संविधानाचा स्फूर्तीदायी जागर केला. संविधानाचा अस्त्र घेऊन खरी लोकशाही नांदवूया तसेच त्यांनी खऱ्या संविधानाचा परिचय करून दिला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अशोक शिरगुप्पे म्हणाले, स्वामी तिन्ही जगाचा ! संविधान विना भिकारी ! संविधान नसेल तर आपलं अस्तित्व राहणार नाही. यासाठी संविधानाच्या अस्तित्वासाठी आपणास जागरुक राहिले पाहिजे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रा.डॉ. नितीश सावंत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. के.डी.खळदकर व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केला.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.एस.बी.बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सौ.सुनंदा शेळके यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रा. डॉ.टी.जी.घाटगे, सुभाष साठे, कॉलेजचे प्राध्यापकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व इतर महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा