Breaking

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

* राष्ट्र विकासासाठी अर्थशास्त्रातील संशोधन काळाची गरज : प्रा.डॉ. ए. के पाटील*


अग्रणी महाविद्यालयात मार्गदर्शन करताना डॉ. अण्णा पाटील व इतर मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


विटा : अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बळवंत कॉलेज, विटा येथे अर्थशास्त्र विभागाच्या मार्फत अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती" या विषयावर आयोजित करण्यात आली होते.सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून “मा. प्रा. डॉ. पाटील अण्णा काका (विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग सदगुरु गाडगे महाराज कॉलेज,कराड) हे तज्ज्ञ मार्गदर्शक व  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ. राजेंद्र मोरे उपस्थित होते.

    डॉ. ए. के. पाटील यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अर्थशास्त्रातील संशोधन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.या विधानाला आधार देत असताना त्यांनी जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या अर्थशास्त्रीय संशोधनाचे दाखले ही दिले व ग्रामीण भागामध्ये अर्थशास्त्रातील खरं संशोधन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी कोणत्याही गोष्टीची "वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेला समीक्षात्मक अभ्यास किंवा वैज्ञानिक चिकित्सा म्हणजे संशोधन होय असे मत व्यक्त केले.संशोधन समस्या निवडीपासून ते अहवाल लेखनापर्यंत चे सर्व टप्पे त्यांनी विद्यार्थ्यांना  समजावून सांगितले.

     या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रवीण बाबर यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. एन. एस. खराडे व आभार प्रा. पी.टी. गांजवे यांनी मानले.

       या कार्यशाळेसाठी अग्रणी महाविद्यालयातून प्रतिनिधी म्हणून मायणी कॉलेजचे प्रा.डॉ.विलास बोधगिरे, जीवन प्रबोधिनी कॉलेजचे प्रा. किरण यादव, अग्रणीय महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षाचा कै. बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. ए. के. पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे मा. प्राचार्य राजेंद्र मोरे यांनी केला.

      सदर अग्रणीय महाविद्यालयाच्या आयोजन व साधन व्यक्ती बाबत विद्यार्थी व प्राध्यापक घटकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा