![]() |
प्राणीमित्र अक्षय मगदूम, राहुल घट्टे, ऋषिकेश श्रीखंडे |
कोल्हापूर : बाळासाहेब पाटील ( दादा ) हायस्कूल, आळते येथे छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन तर्फे सर्प प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन संस्थेचे प्राणीमित्र अक्षय मगदूम, प्रमोद जनगोंडा, राहुल घट्टे, ऋषिकेश श्रीखंडे, विनोद मांगुरे, संम्मेद मजलेकर यांनी हा प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला.
![]() |
प्रथमोपचार कसा करावा याचे प्रात्यक्षिक देताना प्राणीमित्र अक्षय मगदूम व राहुल घट्टे |
यावेळी विषारी तसेच बिनविषारी साप कसा ओळखायचा. साप चावू नये यासाठी काय करावे, विषारी साप चावल्यानंतर काय करावे, प्रथमोपचार कसा करावा इत्यादी संबंधी माहिती देण्यात आली.
वनरक्षक मोहन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळासाहेब पाटील ( दादा ) हायस्कूल चे मुख्याध्यापक बाहुबली शिखरे तसेच भाऊसाहेब बाल विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका तेजस्विनी पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा