![]() |
डॉ. ज्ञानदेव काळे आपल्या वडिला समवेत |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
*सुटा पुरस्कृत उमेदवार प्रा.डॉ.ज्ञानदेव काळे याची विजयी कामगिरी*
सातारा : मिरढे (ता. फलटण) येथील मेंढपाळ साळू रामा काळे यांचे सुपुत्र प्रा. डॉ. ज्ञानदेव साळू काळे यांची शिवाजी विद्यापीठ सिनेटच्या दुरंगी लढतीत बहुमताने विजयी होऊन सिनेट सदस्यपदी नुकतीच निवड झाली.
प्रा.डॉ. ज्ञानदेव काळे यांचे आई- वडील अशिक्षित व घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. वडिलोपार्जित आलेला मेंढपाळ व्यवसाय सांभाळत आपल्या मुलाचे संगोपन केलं.मात्र आपल्या मुलाला या व्यवसायात न येऊ देता त्यांने उच्च शिक्षण प्राप्त करून मोठा झाला पाहिजे ही भाबडी आशा डोळ्यासमोर ठेवली. प्रा.डॉ.ज्ञानदेव यांनी कुटुंबातील सदस्यांचा आधार घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वडिलांची ही इच्छा पूर्ण केली.यासाठी शिक्षणाची जबाबदारी कुटुंबातील इतर सदस्यांना घेतली.
प्रा.डॉ. काळे यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे चुलते गोसाजी काळे यांच्याकडे स. गो. बर्वे प्रशाला कुर्ला, माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय वडले, उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण, बी. ए. मुधोजी महाविद्यालय फलटण तर एम. ए. मॉडर्न कॉलेज पुणे, एम. फिल. चे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी, पीएच.डी. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी पूर्ण केली.
प्रा.डॉ. काळे सध्या मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सुटा संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापकांची प्रश्न हाताळण्यासाठी प्रयत्न केले. विविध आंदोलने व यामधून आपला सक्रिय सहभाग नोंदविला.सुटा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत सुटा संघटनेसाठी परिश्रम घेतले. सुटाने त्यांचा प्रामाणिकपणा, काम करण्याची पद्धत व त्यांची क्षमता पाहून त्यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी संधी दिली. या संधीचं सोनं करत त्यांनीही निवडणूक बहुमताने जिंकली.
बहुजन समाजातील अर्थात मेंढपाळाच्या या प्राध्यापक मुलाने ही निवडणूक जिंकून शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य पदाचा बहुमान मिळविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा