Breaking

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

*युवा महोत्सवात सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाची विजयी घोडदौड*


कुलगुरू प्रा.डॉ.दिगंबर शिर्के सोबत प्रा.प्रतिभा घाटगे, प्रा.डॉ.प्रकाश टोणे, प्रकाश काळे व अशितोष कीर्तीकर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवात चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर आता शिवाजी विद्यापीठाच्या ४२ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवातही महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारत सांस्कृतिक कलेत अव्वल स्थान असल्याचं सिद्ध करीत महाविद्यालयांने आपला वरचष्मा ठेवला आहे.

        आटपाडी येथे पार पडलेल्या  मध्यवर्ती युवा महोत्सवात लोककला, मूक नाट्य, हिंदी वक्तृत्व, सांघिक सहभाग घेतला होता. रचनाकृती, स्थळचित्र, व्यक्तिचित्र, भित्तिचित्र निर्मिती, कातर काम, स्थळ छायाचित्रण, माती काम, रांगोळी, एकपात्री अभिनय, पाश्चिमात्य एकल गायन, मेहंदी अशा विविध १६ कला प्रकारांत महिला महाविद्यालयाने सक्रिय सहभाग नोंदविला होता.

      या महोत्सवात महाविद्यालयाने लोककला, एकपात्री अभिनय, पोस्टर मेकिंग मध्ये प्रथम स्थान सिद्ध केले. मूकनाट्य कला प्रकारात उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यश मिळवले. या  महाविद्यालयाने लोककला प्रकारात महाविद्यालयाला "नृत्य विभागाची चॅम्पियनशिप" प्राप्त झाली. त्यासाठी मानाचा सरदार बाबासाहेब माने फिरता चषक व विलिंग्डन गौरव चपक महाविद्यालयाला प्राप्त झाला.

     प्रा. डॉ.प्रतिभा घाटगे, डॉ. प्रकाश टोणे, पंकज काळे, आशुतोष कीर्तिकर यांचे उत्तम नेतृत्व व अनमोल मार्गदर्शन केले.

        सावित्रीबाई फुले महाविद्यालयाने मिळवलेलं विविध कला प्रकारातील मिळवलेल्या सुयशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा