Breaking

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

*संशोधन हे सर्जनशील, नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी असले पाहिजे : प्रा. डॉ. ए.के.पाटील यांचे प्रतिपादन*

 

मार्गदर्शन करताना डॉ. ए. के .पाटील व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*


विटा  :रयत शिक्षण संस्थेचे, बळवंत कॉलेज विटा येथील कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाच्या वतीने 'सर्जनशील संशोधन व लेखन कौशल्य' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रा.डॉ. ए.के. पाटील विभाग प्रमुख सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, हे  तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते

        डॉ.ए.के.पाटील संशोधन प्रकल्प कसा तयार करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये संशोधनाचा विषय, संशोधनाची समस्या,अभ्यासाचे महत्त्व, गृहीतके, संशोधन पद्धती, संशोधनाची उद्दिष्टे, प्रकल्प लेखन व निष्कर्ष या संशोधनाच्या टप्प्यावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे विवेचन केले. त्याचबरोबरच  संशोधन हे सर्जनशील, नाविन्यपूर्ण, समाज उपयोगी असले पाहिजे असे मत त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडले. तसेच शिवाजी विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षाचा कै. बॅरिस्टर पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. ए.के. पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आला.

    या कार्यशाळेमध्ये अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. आर.एस. मोरे यांनी केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. श्रेया पाटील ( आय.क्यू.ए. सी. कोऑर्डिनेटर आणि कॉमर्स विभाग प्रमुख) यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय  प्रा. सौ.आर.एच.चव्हाण यांनी केला.   

     कार्यक्रमाचे आभार डॉ. एस. एच. कोकरे यांनी मानले, तसेच कार्यक्रमाचे संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा