Breaking

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

*जयसिंगपूर येथील तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या*


जयसिंगपूरातील युवकाची आत्महत्या


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


 जयसिंगपूर : शहरातील प्रियदर्शनी कॉलनी मधील दीपक जाधव वय वर्ष ३३ या तरुणाने नैराश्यातून छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झालेली आहे.

     शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ७.३० पर्यंत सदरची घटना घडली आहे. सदरची वर्दी शशी जाधव यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत महिला हेड कॉन्स्टेबल प्रभावती कांबळे अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा