Breaking

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

*डॉ.विकास आवळे यांची वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड*


डॉ. विकास आवळे यांची बिनविरोध निवड


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक  


सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील  वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास आवळे यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली. 

    डॉ. आवळे यांनी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा) च्या वतीने निवडणूक लढवली असून ते सातत्याने विषयाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असतात. संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी विषयाला उंची देण्याचे काम केले आहे.अभ्यासू व सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या यशाने असंख्य घटकांनी समाधान व्यक्त केला आहे. 

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा