Breaking

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

*अपघाताला निमंत्रण ; झेले हायस्कूल ते धरणगुत्ती रोडची झाली चाळण : रोडची किरकोळ डागडुजी*



झेले हायस्कूल ते  धरणगुती रोड


*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  झेले हायस्कुल ते धरणगुत्ती रोडची अवस्था अत्यंत वाईट झाली असून सर्वच रस्त्याची चाळण झाली आहे.

     सदर रस्त्याचे काम सन २०१३ मध्ये झाले असल्याची माहिती

मिळत असून यानंतर या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर प्रत्येक फुटावर खड्डे असून हे सर्व खड्डे साधारण फूटभर खोल आहेत, रोटरी हॉल जवळची परिस्थिती तर त्याहून वाईट आहे, पालिकेने मागील महिन्यात येथे मुरूम टाकला खरा पण मुरुमातील भलेमोठे दगड आता दुर्घटनेचे कारण होत आहेत.

      स्वप्न नगरमधील रस्त्याचा प्रश्न तर ऐरणीवरचा आहे, इकडे एकदाही रस्ते झाले नाहीत. या प्रश्नांवर महिलावर्गातून मोठी नाराजी दिसून येत आहे.आत्ताच संपलेल्या पावसात बऱ्याच महिला या रस्त्यांमुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्या आहेत. या रस्त्यावरून शाळा महाविद्यालयीन मुले मुली, धरणगुत्ती गावातील नागरिकांची या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. हा रस्ता सर्व घटकांचा मुख्य रस्ता बनला असून या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

     नगरपालिकेने वेळीच या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याबाबत येथील नागरिका कडून बोलले जात आहे. तसेच सदर घटकांनी यामध्ये लक्ष घालून वेळीच रस्ता दुरुस्त करावा अशी जोरकस मागणी येथील नागरिकाकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा