Breaking

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

*नृसिंहवाडी येथे कलागंधर्व साहित्य महोत्सव 2022 उत्साहात संपन्न*

  

कला गंधर्व साहित्य संमेलन

 *चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


 नृसिंहवाडी  : सर्व कला मानव निर्मित असल्यामुळे त्या एकत्र आणण्याची आवश्यकता आहे. सर्व कला या भाषेवर आधारित आहेत भाषेवर साहित्य अवलंबून आहे म्हणून साहित्याच्या माध्यमातून इतर कला पकडता येतात असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती  मंडळाचे अध्यक्ष थोर विचारवंत डॉ सदानंद मोरे मोरे यांनी येथे व्यक्त केले.

      श्री क्षेत्र नृसिंहवाडी  येथील माहेश्वरी भवन येथे साहित्य, संगीत,कला प्रेमी मंडळाच्या वतीने कला गंधर्व महोत्सव आयोजित केला होता,उद्घाटन समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते या समारंभास सरपंच श्रीमती पार्वती कुंभार, देवस्थानचे चिटणीस संजय पुजारी, विश्वस्त वैभव पुजारी,उपसरपंच पूनम जाधवप्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते.


   रविवार दि 20 नोव्हेंबर 2022 रोजी सुरुवातीस वारकरी संप्रदायाच्या दिंडीने सुरुवातीला गंधर्व महोत्सवास सुरुवात झाली. या दिंडीचे भव्य स्वागत समारंभ स्थळी करण्यात आले.समारंभाचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब आलासकर यांनी केले,या समारंभात उपस्थित रसिकांना डॉक्टर सदानंद मोरे यांनी भाषणाची एक प्रकारे   मेजवानी दिली. ते पुढे म्हणाले 14 विद्या 64 कला आहेत हे जरी खरे असले तरी संगीताच्या सुरावर त्या अवलंबून आहेत सूर आळवून राग निर्माण करणे हे काम कसोटीचे आहे संगीत हा विषय देखील असाच आहे की ज्यातून रसिकांना तो डुलकी समाधी पर्यंत नेण्याचे काम  करतो महाराष्ट्राचे धार्मिक जीवन समृद्ध आहे या समृद्धीत दत्त संप्रदायाला विशेष महत्त्व आहे त्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.नागरिक सुसंस्कृत बनण्यासाठी अशा प्रकारची संमेलने आवश्यक आहेत असे ते भाषणाच्या शेवटी म्हणाले.

       मंडळाच्या वतीने पत्रकार विनोदपुजारी यांच्या जीवन योद्धा पुस्तकाचे गुरुप्रसाद रिसबुड व  प्रशांत आडे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पाक  कलाकारांचा  विविध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच जीवन गौरव पुरस्कार  प्राध्यापक मुकुंद पुजारी यांचा यावेळी मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला.

    या कला गंधर्व  महोत्सव स्थळी माहेश्वर भवन येथे चित्र प्रदर्शन ही  भरण्यात आले होते समारंभाचे सुरेख सूत्रसंचलन डॉक्टर दिनेश फडणीस व सुकन्या श्रीकांत पुजारी यांनी करून रसिकांची वाहवा मिळवली आभार प्रदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पुजारी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा