Breaking

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

*विद्यापीठ निवडणुक प्रचारात सुटाची आघाडी ; प्राध्यापकांचा प्रचंड प्रतिसाद*


शिवाजी विद्यापीठ निवडणूक २०२२


*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्राधिकरण मंडळाच्या निवडणूका होत आहेत. गेल्या आठवड्याभरात विविध अभ्यास मंडळ, अधिसभा व विद्या परिषदेच्या निवडणुक प्रचाराची रणधुमाळी रंगलेली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ अर्थात सुटा प्रचारात आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.तरीही आजपर्यंतचा इतिहास पाहता शिक्षक गटामध्ये सुटाच प्रभावी ठरली आहे 


       शिक्षक मतदार संघासाठी विकास आघाडी व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ यांच्यामध्ये प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत काटे की टक्कर असते. या पंचवार्षिक निवडणुकीत सुटाकडून सुरुवातीपासून जिल्हानिहाय प्रचारासाठी पद्धतशीर व उत्तम नियोजन असणाऱ्या कार्यशील व सक्षम प्राध्यापकांची टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमने नियोजनाप्रमाणे सुटाची भूमिका, तसेच विशेष करून कोरोना काळात प्राध्यापक केंद्रबिंदू मानून केलेले काम व  इतर प्राध्यापक हितार्थ कार्य व आंदोलने ही प्रचारातील महत्त्वाचे विषय प्राध्यापक घटकासमोर विविध माध्यमातून  मांडण्यात येत आहे. 


   यावेळी सुरुवातीपासूनच  एजेंडानिहाय बैठक व त्या आधारावर आखलेले धोरण याद्वारे मतदारापर्यंत पोहोचण्याचा काम व माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी प्राध्यापकांनी सुटा संघटनेला दिलेली साथ व मतदाराकडून विचारलेल्या प्रश्नांचं निराकरण सुटाच्या आघाडीच्या फळीतील मंडळीकडून केले जात आहे. या निवडणुकीमध्ये सुटाकडून नवीन शैक्षणिक धोरण व प्राध्यापक घटकासमोर असणाऱ्या आवाहन याविषयी पद्धतशीर मांडणी करून त्यांना सुरक्षा कवच प्रदान करण्याचे कार्य संघटना करणार असल्याची शाश्वती देण्यात येत आहे.

      प्रचारातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुटाने प्रत्येक महाविद्यालयात किमान एक तास ते दोन तास व्याख्यान रुपी प्रचार केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ७१ दिवसाचे काम बंद आंदोलनाचे व्याजासह मिळवून दिलेली थकीत वेतन,७ वा वेतन आयोग,७ व्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम या  माध्यमातून मिळालेले यश सुटा ला अभुतपूर्व विजयाकडे नेणार अशी भावना सर्वच प्राध्यापक सभासद व्यक्त करत आहेत       एकूणच सुटाच्या सर्व उमेदवारांना तिन्ही जिल्ह्यात प्रचारात आघाडी व प्रतिसाद वाढत  असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा