Breaking

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

*आर्थिक, राजकीय व सामाजिक समतेचा प्रसार हीच क्रांतिसूर्याला शाश्वत आदरांजली : प्रा.डॉ.शिवाजीराव भोसले*


मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. शिवाजीराव भोसले


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा : जगामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करून समता आणि बंधुतेचा आग्रह करणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचा वसा आणि वारसा जपत पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुद्धा सत्यशोधक समाजाची चळवळ जनमानसापर्यंत रुजवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला असे मत महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केले.

        रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले अध्यापक विद्यालयाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. प्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.भोसले उपस्थित होते. भारताचे संविधान तयार करीत असताना महात्मा फुले यांच्या विचारांचा, संस्कारांचा, तत्वांचा संविधानामध्ये उल्लेख दिसून येतो प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकरणासाठी महात्मा फुले यांनी आजीवन आग्रह धरला स्वतः शाळा सुरू करून वंचित उपेक्षित घटकांच्या शिक्षणासाठी सत्यशोधक समाजाच्या वतीने सुद्धा कार्य केले  प्रत्येक गावागावात सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते तयार करून समाजाच्या विविध समस्या लक्षात घेऊन कार्यक्रमांची आखणी केली असे मत डॉ. भोसले यांनी व्यक्त केले.

       विद्येची महत्ती माणसाला किती मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ शकते शिक्षणामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांती होते असे मत कार्यक्रमाचे  अध्यक्ष प्राचार्य उदयकुमार सांगळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कार्यावर व जीवनपटावर आधारित प्रशिक्षणार्थ्यांनी भित्तिपत्रक तयार केलेली होती त्याचे उद्घाटन डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ. शिवाजी भोसले यांना  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने गुणवंत प्राध्यापक पुरस्कार मिळाला त्याबद्दल अध्यापक विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र घाटगे यांनी केले. याप्रसंगी प्रा. प्रदीप हिवरकर, प्रा. सोमनाथ शिंगाडे, डॉ. दादासाहेब नवले , प्रा. ज्योती शिंदे व प्रशिक्षणार्थी  उपस्थित होते. याप्रसंगी स्नेहा परदेशी, मनीषा धोत्रे, आदेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता जाधव व आभार कल्पना जाधव यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा