![]() |
इचलकंरजीच्या समाजवादी प्रबोधनीत डॉ. जे.एफ. पाटील यांची शोकसभा |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : प्रा.डॉ.जे.एफ.पाटील हे समाजवादी प्रबोधिनीच्या कामात स्थापनेपासून सक्रिय असलेले अखेरचे बिनीचे अभ्यासक व संघटक होते.तसेच ते विविध सामाजिक -शैक्षणिक संस्थांचे ,संघटनांचे आधारस्तंभ होते .त्यांच्या निधनाने प्रबोधन - परिवर्तन -सामाजिक चळवळींची मोठी हानी झाली आहे.समाजवादी प्रबोधिनीच्या कार्याला सर्वांगीण सामर्थ्य देण्याची भूमिका त्यांनी अध्यक्ष झाल्यावर अलीकडेच व्यक्त केली होती.ती आपण प्रामाणिकपणे व जोमाने पार पाडणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत बोलत होते.
प्रारंभी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी म्हणाले, प्रा.डॉ.जे.एफ. पाटील समाजवादी प्रबोधिनीचे गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनचे ज्येष्ठ सहकारी व मार्गदर्शक होते.या वर्षीच्या प्रारंभी ते अध्यक्ष झाल्यानंतर प्रबोधिनीच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्याचे धोरण ठरवून धोरण तशी सामूहिक आखणीही करण्याचे काम सुरू होते. आचार्य शांताराम गरुड,प्रा.डॉ. एन. डी.पाटील, शहीद गोविंद पानसरे यांच्यानंतर समाजवादी प्रबोधिनीचे काम अधिक ताकतीने करण्याचा त्यांचा मानस होता. अशावेळी त्यांचे अचानक निघून जाणे हे अतिशय वेदनादायी आहे. प्रबोधिनीचे काम सर्वार्थाने व्यापक करणे आणि प्रबोधिनीला सक्षम करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे.
यावेळी विविध वक्त्यांनी प्रा. डॉ.जे.एफ. पाटील यांचे समाजवादी प्रबोधिनीतील काम ,शिवाजी विद्यापीठातील कार्य ,त्यांचा असलेला अफाट लोकसंग्रह ,विविध सामाजिक संस्थांशी असलेला त्यांचा ऋणानुबंध, अर्थसंकल्पावरील त्यांची सातत्यपूर्ण मांडणी, अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी ,नवे वक्ते व लेखक घडवण्याचे त्यांचे कार्य, सततचे लेखन व व्याख्यान, विविध संस्था संघटनांच्या उभारणीतील योगदान, एक माणूस म्हणून झालेले त्यांचे दर्शन , एक आदर्श शिक्षक व प्राध्यापक म्हणून त्यांनी दिलेले योगदान अशा अनेक बाबींचा उल्लेख करून आदरांजली वाहिली
यावेळी प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील ( बागल विद्यापीठ),
शशांक बावचकर (काँगेस पक्ष ),जयकुमार कोले ( स्वाभिमानी पक्ष ),दत्ता माने ( माकप ),अजितमामा जाधव ( भाजप ),शिवाजी साळुंखे (शेकाप ),मनोहर जोशी (वृत्तपत्र पत्रलेखक संघ), ॲड.जयंत बलुगडे ( इचलकरंजी बार अससिएशन ),प्रा.डॉ.प्रभाकर माने ( जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर ),प्रा.डॉ.मनोहर कोरे (डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विलिंग्डन महावद्यालय ), प्रा. डॉ.संजय साठे (विद्रोही सांस्कृतिक चळवळ),सुनील बारवाडे (लाल निशाण पक्ष ),प्रा डॉ.सुनीता तेलसिंगे ( अण्णासाहेब डांगे महाविद्यालय ) अशोक केसरकर आदींनी मनोगते व्यक्त केली. त्यातून प्रा. डॉ.जे.एफ.पाटील यांच्या व्यक्तित्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले.
यावेळी सौदामिनी कुलकर्णी,धोंडिबा कुंभार,रवी जाधव,रामदास कोळी,सदा मलाबादे ,तुकाराम अपराध,अशोक मगदूम, के.एम.पाटील,नारायण लोटके,बाळासाहेब नरशेट्टी,अशोक माने,शिवाजीराव पाटील,अप्पासाहेब चौगुले,संदीप चोडणकर,शिवाजी शिंदे,अप्पासाहेब कालेकर,मेहबूब सय्यद,प्रा.विजय देसाई आदी उपस्थित होते.माजी खासदार राजू शेट्टी ,आमदार प्रकाशराव आवाडे, जेष्ठ अर्थतज्ञ डॉ.राजन तुंगारे ,मदनराव कारंडे आदींनी परगावी असल्याने डॉ. जे.एफ.पाटील यांच्या निधनाबद्दल दूरध्वनीवरून शोक व्यक्त केला. शेवटी सर्वांनी स्तब्धता पाळून प्रा.डॉ.जे.एफ. पाटील यांना आदरांजली वाहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा