Breaking

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

*डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कु.शर्वरी जीवन पाटील हिचा प्रथम क्रमांक*


कु. शर्वरी जीवन पाटील हिचा सत्कार करताना


*सौ.गीता माने : सहसंपादक*


जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ च्या वतीने घेण्यात आलेल डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शिरोळ तालुक्यात येथील स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ज्ञानगंगा हायस्कूल, जयसिंगपूर ची विद्यार्थिनी कु. शर्वरी जीवन पाटील हिचा प्रथम क्रमांक आला.आहे.

     गुरुवारी रात्री या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. शिरोळ तालुक्यातील तीन केंद्रावरती १००० हून अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी समाविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांच्या मध्ये कुमारी शर्वरी पाटील हिने १०० पैकी ९० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

    या विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, स्कूल कमिटीचे अध्यक्षा स्वरूपा पाटील यड्रावकर, उपाध्यक्ष राजेंद्र झेले यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक संजय चावरे,विज्ञान शिक्षक बी. ए गायकवाड, पालक जीवन पाटील, सतिश माने यांच्यासह ज्ञानगंगा हायस्कूल मधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा